Wednesday 5 April 2017

मोटरसायकलहून ‘बेटी बचाओं बेटी पढाओं’ व ‘जलसंरक्षणा’चा देशभर संदेश



नवी दिल्ली, 5 : मोटरसायकलहून देशातील २० राज्य आणि २ केंद्र शासित प्रदेशात प्रवास करून बेटी बचाओं बेटी पढाओं’ आणि ‘जल संरक्षणाचा संदेश पोचविणा-या पुणे येथील डॉ. विजय चौधरी आणि त्यांच्या पत्नी वैशाली चौधरी यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार करण्यात आला.
        स्त्री भ्रूण हत्या व जलसरंक्षण या कळीच्या विषयांबाबत जनजागृतीच्या प्रवासात चौधरी दांपत्य नुकतेच  दिल्लीत पोहचले. चौधरी दांपत्याच्या या अतिशय महत्वपूर्ण उद्देशाबद्दल महाराष्ट्र परिचय केंद्रात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या हस्ते उभयतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारीक चर्चा झाली.    
                                                 जनतेच्या उत्तम प्रतिसादानेच मिळाली प्रेरणा
            आम्ही देशाच्या ज्या भागात गेलो तिथे जनतेचे भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही विपरीत हवामान, निमर्नुष्य व खडतर रस्ते, काही राज्यांतील कायदे नियम आदि अडचणींवर मात करू शकलो अशा भावना डॉ. विजय चौधरी यांनी व्यक्त केल्या. ते  म्हणाले,  ६ फेब्रुवारी  २०१७ ला आम्ही पुण्याहून निघालो. गोवा नंतर कर्नाटक, केरळ अशी दक्षीणेकडील राज्य व नंतर पश्चिम बंगाल, ओडिसा, पुर्वोत्तरेकडील राज्य, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली असा २० राज्य व २ केंद्र शासीत प्रदेशांतून प्रवास करत दिल्लीत पोचहलो. आतापर्यंत 13,477 किलोमीटरचा प्रवास  पूर्ण केला आहे. पेशाने डॉक्टर असलो तरी सामाजिक ऋण फेडण्याच्या  उद्देशाने आम्ही सुरु केलेला हा प्रवास खडतर असला तरी जनतेच्या उत्तम प्रतिसादामुळे सुकर झाला उर्वरीत ९ राज्य आणि ३ केंद्र शासीत प्रदेशातही असाच प्रतिसाद मिळेल अशा भावना डॉ. चौधरी यांनी व्यक्त केल्या.   
                                          


                                                  बेटी बचाव बेटी पढाव आणि जलसंरक्षणाचा दिला संदेश
मुळचे जळगावचे डॉ. चौधरी यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय पुण्यातीलच देहू रोड परिसरात थाटला. लग्नानंतर चौधरी दांपत्याला दोन मुल झाली. व्यवसाय व दैनंदिन जगण्यातून त्यांना स्त्रीभ्रूण हत्या व जल सरंक्षणा’ हे भारतीय समाजापुढील भिषण प्रश्न असल्याचे जाणवले, त्यातूनच या विषयांवर जनजागरुकता करण्यासाठी मोटर बाईक ने देशभ्रमणास निघाले. त्यांच्या मोटार बाईक वर बेटी बचाओं  बेटी पढाओं आणि जल संरक्षणा संदर्भातील संदेश  लावण्यात आले आहे. दिवसभर २५० किलो मिटरचे अंतर पार करून ते वाटेत लागणा-या गावतील शाळा , महाविद्यालये, विविध महिला गट, कार्यशाळांमध्ये  स्त्रीभ्रूण हत्या व जल सरंक्षणा बाबत लोकांना जागरूक करतात.  वैशाली चौधरी सांगतात, तुम्हाला सून म्हणून मुलगी हवी असते, मग मुलीला जन्माला येण्यापासून रोखण्यात कुठले शहाणपणयाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो विचारांची देवाण घेवाण होऊन एक सकारात्मक वातावरण तयार होते. त्याच वेळी आम्ही पाण्याचे महत्वही पटवून देतो जल संरक्षणासाठी करावयाचे उपाय याबद्दलही लोकांना सांगतो. लोकांना हे विचार पटतात आपण यासंदर्भात नक्की उत्तम काम करू असा त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसादच आमच्या कामाची पावती असते आणि आम्ही पुढाच्या ठिकाणाकडे वळतो असे वैषाली चौधरी सांगतात.   
                                                                          ठिकठिकाणी मिळाला बहूमान
 या भारत भ्रमणासाठी आम्ही गेल्या दीड वर्षांपासून तयारी केली, प्रत्येक राज्य तिथली भौगौलिक परिस्थिती, भाषा, संस्कृती याचा अभ्यास केला. त्यामुळे या प्रवासात आम्हाला खूप चांगले अनुभव आले. मणिपूरमधे इंफाळ जवळ नोणी या गावात आम्हाला रात्री झोपेतून उठून जेवन बनवून खाऊ घालणारे काका, पश्चिम बंगाल मध्ये शाळकरी मुलांनी स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी घेतलेला संकल्प, आसाम मध्ये महिला  शिक्षीकांच्या कार्यशाळेत मिळेलेले प्रेम व त्यांनी घेतलेला संकल्प अशा एकानेक उत्तम अनुभव या प्रवासात आले हा आमच्यासाठी बहुमान ठरल्याचे चौधरी दांपत्य सांगतात.   ठिक-ठिकाणी आपले उत्तम स्वागत आणि आवभगत झाल्याचे अनुभवही त्यांनी  कथन केले . 
             या कार्यक्रमास  कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्तवीक केले. उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी  आभार मानले.
                                                                       ०००००



No comments:

Post a Comment