शहीद नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र
नवी दिल्ली, 06 : लष्करात
उत्तम सेवा देणा-या महाराष्ट्राच्या तीन अधिका-यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी
यांच्या हस्ते परम विशिष्ठ सेवा पदकाने(पीव्हीएसएम) सन्मानीत करण्यात आले. शहीद नायक
पांडुरंग गावडे यांना अतुलनीय शौर्यासाठी जाहीर झालेला मरणोत्तर शौर्य पुरस्कार , त्यांच्या
पत्नी व आईने स्वीकारला.
भारतीय
लष्कराच्यावतीने प्रजासत्ताक दिनी शौर्य व विशिष्ठ सेवेसाठी जाहीर पुरस्कारांचे आज राष्ट्रपती भवनात एका
शानदार कार्यक्रमात वितरण करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी,
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
लष्करातील सर्वोच्च पदक म्हणून संबोधले जाणारे ‘परम विशिष्ठ सेवा पदक’ लेफ्टनन जनरल(ले.ज.)(निवृत्त) राजीव कानीटकर, ले.ज.अशोक शिवाने आणि ले.ज. विनोद खंडारे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी चार मराठी अधिका-यांना लष्कारातील
मानाचे समजल्या जाणारे ‘अतिविशिष्ठ सेवा पदक’ (एव्हीएसएम) प्रदान करण्यात आले. ले.ज.अशोक आंब्रे यांना ‘अतिविशिष्ठ सेवा पदक’ व ‘बार’ प्रदान करण्यात आले. तसेच व्हाईस
ॲडमिरल सुनील भोकरे, व्हाईस ॲडमिरल सतीश घोरमाडे आणि एअर मार्शल(निवृत्त) प्रशांत खांडेकर यांना ‘अतिविशिष्ठ सेवा पदक’ (एव्हीएसएम) प्रदान करण्यात आले.
शहीद नायक पांडुरंग गावडे यांना
मरणोत्तर शौर्य चक्र
राष्ट्रीय रायफल्सचे नायक पांडुरंग गावडे यांना
मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला
होता, शहीद गावडे यांच्या पत्नी प्रांजल गावडे व आई महालक्ष्मी गावडे यांनी हा
पुरस्कार स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली
येथील नायक पांडुरंग गावडे जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात चक द्रुगमुल्ला
येथे दहशतवाद्यांशी झोलेल्या भीषण चकमकीत गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान २२
मे २०१६ रोजी नायक गावडे यांचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment