नवी
दिल्ली दि. ११ : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची १९० वी जयंती आज
महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा
गांधीमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक
आयुक्त लोकेश चंद्र यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर
सहाय
यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून
आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात
महात्मा फुले यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात
महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
No comments:
Post a Comment