नवी
दिल्ली, दि.१७ : जमीन भाडे पट्टयाची रक्कम जमीनीच्या बाजार भावाशी जोडावी, जमीन
मालकांना भाडेपट्टयाने दिलेल्या जमीनी सुरक्षीतरित्या परत मिळाव्या अशा महत्वपूर्ण
सूचना सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे केल्या
.
‘कृषी क्षेत्राच्या सर्वंकष
विकासासाठी जमीन भाडेपट्टयाने देण्याचे धोरण’ या विषयावर
कृषी क्षेत्रात कार्यरत लँडइसा या संस्थेच्यावतीने येथील इंटरनॅशनल सेंटर मध्ये
राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या दुस-या सत्रात ‘कृषी क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी जमीन भाडेपट्टयाने देण्यासंदर्भातील
सुधारणा’ या विषयावरील चर्चा सत्रात श्री. गायकवाड यांनी
सूचना मांडल्या. खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यावेळी
अध्यक्षस्थानी होत्या, वरिष्ठ नेते के.सी. त्यागी, खासदार राजू शेट्टी, कृषी मुल्य
आयोगाचे माजी अध्यक्ष टी. हक आदी मान्यवर यावळे उपस्थित होते.
श्री. गायकवाड म्हणाले, शेतीमध्ये
अतिरीक्त मनुष्यबळ असून ते शेती क्षेत्राबाहेर जाण्यासाठी शेती प्रत्यक्ष न
करणा-या परंतु शेतजमीन मालकीची असणा-या लोकांना पुढील ३० वर्षांपर्यंत शेतकरी
मानणारे प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच, शेतक-यांना कर्ज देताना जमीनीची किंमत विचारात घ्यावी व संपूर्ण ८-अ अर्जावरील
जमीन बँकानी गहान घेऊ नये. कोणत्याही परिस्थितीत कंपन्याना जमीनी भाडे पट्टयाने
देऊ नयेत अशा महत्वपूर्ण सूचना श्री. गायकवाड यांनी यावेळी मांडल्या.
श्री. गायकवाड यांनी मांडलेल्या
सूचना महत्वपूर्ण असून कृषी क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी जमीन भाडेपट्टयाने
देण्याचे धोरण निश्चित करताना या सूचनांचा विचार करण्यात यावा असे या चर्चा
सत्राच्या अध्यक्ष रेणुका चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
000000
No comments:
Post a Comment