नवी
दिल्ली, 17 : सांगलीचे
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली .
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद
कांबळे यांनी श्री गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. कांबळे यांनी श्री. गायकवाड
यांना दिली. श्री. गायकवाड यांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट
स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध
विभागांना भेट देऊन श्री. गायकवाड यांनी
माहिती जाणून घेतली. श्री. गायकवाड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल
समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
00000
No comments:
Post a Comment