नवी दिल्ली, 03: नवी
दिल्लीतील विज्ञान भवनाच्या प्रांगणात केंद्रीय रस्ते वाहतूक व
महामार्ग मंत्रालयाच्या वतीने 3 ते ५
मे दरम्यान इंडिया इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अॅण्ड लॉजिस्टीक्स समीट-
2017 आयोजित करण्यात आली आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्र पॅव्हीलियन असून
राज्य रस्ते विकास महामंडळ ( एमएसआरडीसी), राज्य रस्ते परिवहन महामंडळ,
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई मेट्रो रेल
महामंडळ व
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. यांचे प्रदर्शनीय स्टॉल आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ( सीआयआय),
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, फिक्की यांच्या सौजन्याने हे समीट
होत आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंडिया इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अॅण्ड लॉजिस्टीक्स समीट-
2017 या
प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या त्या
क्षेत्रातील दिग्गज कंपन्यानी भाग
घेतला आहे.
समृद्धी महामार्ग
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या बांधणीची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळांवर आहे. या
प्रदर्शनीय स्टॉलमध्ये समृद्धी महामार्गाचे संगणकीय संकल्प चित्र मांडण्यात आले आहे.
तब्बल ४६
हजार कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती
देणारा आहे.
No comments:
Post a Comment