Friday 23 June 2017

महाराष्ट्राला “अमृत” योजनेसाठी 47 कोटींची प्रोत्साहन राशी



नवी दिल्ली, 23 : अमृत (अटल नागरी पुर्ननिर्माण व परिवर्तन योजनेंतर्गत) आज महाराष्ट्राला 47 कोटींची प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली. केंद्रीय नगर विकास मंत्री एम.वैंकय्या नायडू यांच्या हस्ते महाराष्ट्र नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ही प्रोत्साहन राशी स्वीकारली.
येथील विज्ञान भवनात आयोजित  शहरी परिवर्तन  या राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय नगर विकास तथा शहरी गरीबी निर्मूलन मंत्री एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते अमृत योजनेतंर्गत उत्कृष्ट कार्य करणा-या देशातील 16 राज्यांना एकूण 500 कोटी रूपयांची राशी प्रदान करण्यात आली.
अमृत योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय नगर विकास मंत्री एम.वैंकय्या नायडू यांच्याहस्ते  47 कोटींची राशी प्रदान करण्यात आली.
 अमृत योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळालेली  प्रोत्साहनपर रक्कम ही या योजनेंतर्गत मिळणा-या रक्कमे व्यतिरिक्तची अतिरिक्त रक्कम आहे. अमृत योजनेंतर्गत प्राप्त प्रोत्साहनपर रक्कम ही केवळ अमृत योजनेमधील नवीन प्रकल्प, प्रकल्पांमधील सुधारणा आणि क्षमता विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment