Friday 23 June 2017

स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडची निवड



                 
नवी दिल्ली, २३ : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राज्यातील पिंपरी-चिंचवड शहाराची आज निवड झाली .  या निवडीने आतापर्यंत राज्यातील ११ शहरांचा स्मार्ट सिटीयोजनेत समावेश झाला आहे.  
            येथील विज्ञानभवनात आयोजित  शहरी परिवर्तन या राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय नगर विकास तथा शहरी गरीबी निर्मूलन मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी  आज स्मार्ट सिटी योजनेसाठी देशातील ३० शहरांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातून पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे.   
स्मार्ट सिटी योजनेच्या तिस-या टप्प्यात ४० शहरांच्या निवडीसाठी देशभरातून ४५ शहरांनी सहभाग घेतला होता यापैकी ३० शहरांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून पिंपरी चिंचवड ने यात बाजी मारली. यावेळी श्री. नायडू यांनी सांगितले, निवड झालेल्या ३० शहरांना विविध सोयींनी सुसज्ज बनविण्यासाठी या योजनेतंर्गत ५७,३९३ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. आतापर्यंत देशातील ९० शहरांची निवड करण्यात आली असून या शहरांसह आज नव्याने निवड झालेल्या ३० शहरांच्या विकासासाठी एकूण १,९१,१५५ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. उर्वरीत १० स्मार्ट शहरांच्या निवडीच्या स्पर्धेत देशातील २० शहरांमध्ये चुरस असणार आहे. 
 आतापर्यंत महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण- डोंबिवली, औरंगाबाद आणि  पुणे  या १० शहरांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आलेला आहे.       

                                                         000000

No comments:

Post a Comment