नवी दिल्ली, २२ : अमरज्योत कौर अरोरा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
अमरज्योत कौर अरोरा यांची नुकतीच
जनसंपर्क अधिकारी पदावर पदोन्नती झाली असून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
आस्थापनेवर त्यांची पदस्थापना करण्यात आली
आहे. परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी श्रीमती अरोरा यांचे पुष्पगुच्छ
देऊन स्वागत केले. यावेळी कार्यलायाचे कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती अरोरा यांनी याआधी महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, दिल्ली
स्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या निवासी व्यवस्थापक म्हणूनही
त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
No comments:
Post a Comment