नवी दिल्ली,७ : महाराष्ट्र
शासनाच्या ‘वनमहोत्सव मोहिम -२०१७’
अंतर्गत आज येथील महाराष्ट्र सदनांमधे विविध प्रकारच्या १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात सचिव तथा आयुक्त आभा शुक्ला आणि
गुंतवणूक आयुक्त लोकेश चन्द्र यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी
उपस्थित महाराष्ट्र
सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी वृक्ष लागवड केली. याठिकाणी आंबा,फणस, गुलमोहर, चंपा, कडूनिंब,चिकू,
बॉटल पाम आदी ४१ रोपटयांची लागवड करण्यात आली.
श्रीमती आभा शुक्ला म्हणाल्या, “मागील वर्षी राज्यशासनाच्या
वनमोहोत्सव मोहिमेत सहभाग नोंदवून महाराष्ट्र सदनात वृक्ष लागवड करण्यात आली. त्या
वृक्षांची जोपासना व संवर्धन उत्तम प्रकारे करण्यात येत आहे”. श्री लोकेश चन्द्र
म्हणाले,“गेल्या वर्षी महाराष्ट्रसदनात करण्यात आलेल्या वृक्ष
लागवडीमुळे येथील परिसर हिरवागार झाला असून,
सदनात येणा-या आगंतुकांना या झाडांचे आकर्षण आहे. त्यामुळे येथे भेट दणारे आगंतुक वृक्षांसोबत
सेल्फीचा आनंद घेत आहेत. यावर्षी १०१ वृक्षांची लागवड करण्यात आल्याने महाराष्ट्र
सदनाच्या सौंदर्यात आणखी भर पडेल व दिल्लीच्या पर्यावरण रक्षणात आणि प्रदूषण
नियंत्रणात मदत होईल .”
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. सदनात स्थित विधी व न्याय विभाग, खासदार समन्वय कक्ष, सार्वजनिक
बांधकाम विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, स्वागत कक्ष,
महाराष्ट्र सुरक्षा दल आदी विभागांनी वृक्ष लागवडीत आपला सहभाग नोंदविला. येथे
आंबा,फणस, गुलमोहर, कडूनिंब,चंपा, चिकू,
बॉटल पाम आदी ६० वृक्षांची लागवड करण्यात आली .
यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त इशु संधू, टी.व्ही कायरकर, अजित सिंह नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू
निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनीही वृक्ष लागवड केली.
राज्यात
४ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष पूर्ण
वन विभागाने दि. १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत लोकसहभागातून चार
कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आणि हा संकल्प केवळ वन विभागाचा किंवा शासनाचा न
राहता तो जनतेचा झाला. आबालवृद्धांनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभाग नोंदवल्याने
हजारो हातांनी राज्यात वृक्ष लावले आणि वनमहोत्सवाच्या सहाव्याच दिवशी दि. ६ जुलै २०१७ रोजी दुपारी २.०० पर्यंत
राज्यात चार कोटी १५ लाख ४४ हजार ३३० वृक्ष लागल्याची नोंद वन विभागाच्या
संकेतस्थळावर नोंदवली गेली.
०००००
No comments:
Post a Comment