नवी
दिल्ली, 29 : महाराष्ट्रातील उस्मानाबादच्या कमल कुंभार,
नागपूरच्या हरशिनी कन्हेकर आणि सातारा जिल्ह्यांच्या संगिता कांबळे यांना आज वुमन ट्रान्सफॉर्मिंग’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार आणि निती आयोगाच्या
संयुक्त विद्यमाने येथिल हॅबिटेट सेंटरच्या
जॅक्यारंडा सभागृहात ‘वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंण्डिया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे केंद्रीय वस्त्रोद्योग
मंत्री स्मृती झुबेन ईरानी, संयुक्त राष्ट्र संघाचे भारताचे प्रमुख युरी अफान्सिव,
निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगरीया, निती आयोगाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमिताभ
कांत, भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर पुजा ठाकुर या उपस्थित होत्या.
यावेळी देशभरातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य
करणा-या 12 महिलांना पुरस्कृत करण्यात आले. यापैकी 3 सर्वाधिक महिला या
महाराष्ट्राच्या आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह तसेच प्रमाण पत्र असे आहे.
सातारा जिल्ह्यातील संगिता कांबळे या देशातील पहिल्या शेळयांच्या
डॉक्टर आहेत. त्यांनी मान देशी फॉऊंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतले. त्यातून त्यांनी
शेळी समूहाची सुरूवात केली, आज त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला शेळी डॉक्टर
निर्माण झाल्या आहेत. सुरूवातीच्या काळात विरोध असणा-या लोकांकडून आज सन्मानाची
वागणुक मिळत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. केंद्रीय मंत्री श्रीमती ईरानी
यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ग्रामीण महिला
उद्योजक कमल कुंभार या उन्मानाबाद जिल्ह्यातील हिंगलजवाडी येथील आहेत. यांनी 2000 रूपयांच्या गुंतवणूकीतुन करून बांगडयाचा
व्यवसाय सुरू केला होता. स्वंयम शिक्षण प्रयोग या गैरसरकारी संस्थेच्या संर्पकात येऊन
त्यांनी उद्योगाशी संबधित विविध प्रशिक्षण
घेतले. या प्रशिक्षणाचा लाभ इतर ग्रामीण
महिलांनाही दिला. त्यांनी 4000 हजार
ग्रामीण महिलांना उद्योजक बनविले आहे. त्या ऊर्जा सखी म्हणूनही कार्य करतात. त्यांचा
या सर्वाथ कामाचा गौरव आज कार्यक्रमात करण्यात आला. विंग कमांडर पुजा ठाकूर यांच्या
हस्ते श्रीमती कुंभार यांना पुरस्कृत करण्यात आले.
नागपूरच्या हरशिनी कन्हेकर या देशाच्या पहिल्या महिला
फायर फाईटर आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय फायर सर्विस कॉलेजच्या 46 वर्षाच्या
इतिहासात त्यांनी प्रथम विद्यार्थींनी म्हणून प्रवेश घेतला होता. त्यांनी
राष्ट्रीय फायर सर्विस कॉलेजचा इतिहास नव्याने लिहीलेला आहे. त्यांच्या या आगळया-वेगळया
क्षेत्रातील कॅरीयरमध्ये त्या ठामपणे काम करीत असल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात
आला. विंग कमांडर पुजा ठाकूर यांच्या हस्ते श्रीमती कन्हेकर यांना पुरस्कृत
करण्यात आले .
No comments:
Post a Comment