नवी
दिल्ली, 29 : कोणत्याही उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयोगशिलता
तसेच प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मत, ग्रामीण उद्योजक कमल कुंभार यांनी आज व्यक्त
केले.
श्रीमती कुंभार यांना निती आयोगाचा ‘वुमन ट्रान्सफार्म’ पुरस्कार जाहीर झाला असून आज तो
प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने त्या दिल्ली आल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र
परिचय केंद्राला भेट दिली. त्यांच्यासोबत स्वयंम शिक्षण प्रयोग या गैरसरकारी
संस्थेच्या सहभागीदार राजश्री साई यांनीही भेट दिली. परिचय केंद्राच्यावतीने
त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी श्रीमती कमल कुंभार यांचे शॉल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार
केला. जनसपंर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी श्रीमती राजश्री साई यांचे
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती कुंभार
उस्मानादाबाद जिल्ह्यातील हिंगलजवाडी येथील आहेत.
श्रीमती कुंभार म्हणाल्या, आई बांगडया भरण्याचा
छोटेखाणी व्यवसाय करायची. तीच्या सोबत मी ही शिकले या व्यवसायातील बारकावे लक्षात
आले, पुढे 100 महिलांना घेऊन बांगडयांच्या व्यवसायापासून सुरूवात केली. आता त्यांचा
साडी व्यवसाय, बांगडी व्यवसाय, कुक्कटपालन, बकरी पालन, जनरल स्टोर्स, किराणा दुकान
असे, अनेक लघु उद्योग उभारले आहेत. त्यांनी 4 हजार जवळपास ग्रामीण महिलांना उद्योग
उभारणीसाठी प्रेरीत केले असून आज या सर्व महिला ग्रामीण उद्योजक म्हणून आत्मनिर्भर
आहेत. या सगळया प्रवासात अनेक समस्या
आल्यात मात्र सातत्याने काहीतरी नवीन करण्याची आवड आणि त्यासाठी लागणारे प्रशिक्षण
घेत गेल्यामुळे कामात गती मिळाली.
प्रयोगशिल ग्रामीण उद्योजक कमल कुंभार यांचा उस्मानाबाद
ते न्युयॉर्कपर्यंतचा प्रेरक प्रवास
उस्मानाबाद जिल्ह्यातील
हिंगलज येथील प्रयोगशिल ग्रामीण उद्योजक कमल कुंभार यांच्या कामाची दखल संयुक्त
राष्ट्र संघाने घेतील असून त्यांना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातंर्गत 13
सप्टेंबर 2017 ला न्युयॉर्क येथे त्यांना इक्वे्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात
येईज. स्वंय शिक्षण प्रयोग ही संस्था महिला सक्षमिकरणासाठी समर्पित गैरसरकारी
संस्था आहे. कमल कुंभार यांची उद्योग प्रयोगशिलता आणि त्यांना स्वयं शिक्षण
प्रयोगाची मिळालेल्या साथमुळे त्यांनी विविध ग्रामीण उद्योग उभारले. यासह
त्यांनी इतर हजारो ग्रामीण महिलांनाही उद्योग प्रवाहात आणून त्यांना आत्मनिर्भर
केले, त्यांच्या या कामाचा गौरव संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातंर्गत न्युयॉर्क
येथे होणार आहे.
|
कोणताही उद्योग सुर करतांना त्यांची इंतभूत माहिती
करून घ्यावी, त्यात येणा-या समस्या लक्षात घेऊन त्यासंबधित प्रशिक्षण घेण्यावर श्रीमती
कुंभार यांचा भर आहे. वांरवार घेतलेल्या प्रशिक्षणामुळेच आपण इथपर्यंत पोहोल्याचे
त्यांनी सांगितले. यासह कामात
प्रयोगशिलता हवी त्यामुळे आणखी नवनवी संधी उपलब्ध होतात असेही श्रीमती कुभांर म्हणाल्या.
प्रयोगशिल उद्योग उभारणीच्या प्रवासात ‘स्वंयम शिक्षण प्रयोग’
या गैरसरकारी संस्थेने मोठी भूमिका निभावली असल्याचे कृतज्ञ भावही
त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वयं शिक्षण प्रयोग संस्था मागच्या वीस वर्षापासून महाराष्ट्रात
काम करीत असून अन्य सहा राज्यातही आता या संस्थेची सुरूवात झाल्याचे श्रीमती राजश्री
यांनी यावेळी सांगितले. महिलाचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी संस्था कार्य करीत
असल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमांचे प्रस्ताविक उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी केले तर, सुत्र-संचालन आणि अभार माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी
केले.
No comments:
Post a Comment