Tuesday, 1 August 2017

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती साजरी






नवी दिल्ली, 1  : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
  कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला  यांनी  अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, राजीव मलिक, यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


महाराष्ट्र परिचय केंद्रात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, पत्रकार कमलेश गायकवाड, यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment