Monday, 28 August 2017

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत महाराष्ट्राला 9,894 घरांना मंजूरी


एकूण 1 लाख 44 हजार 165 घरांना मंजूरी
नवी दिल्ली, 28 : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरीविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्राला 9,894 परवडणारी घरे मंजूर करण्यात आली आहेत.  या मंजूरीसह  महाराष्ट्राला एकूण 1, 44, 165 घरे मंजूर करण्यात आली. यासाठी केंद्राकडून 2,224 कोटीं रूपयांची आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.  त्याव्यतिरीक्त  15,868 कोटी रूपयांच्या गुंतवणूकीस मंजूरी देण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर 2016 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजने ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत सर्वांसाठी परवडणारे घरे बांधली जाणार आहेत. या योजनेचे ग्रामीण आणि शहरी  असे दोन गट करण्यात आले. आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अंतर्गत आज महाराष्ट्रासाठी 9,894 घरांना मंजूरी देण्यात आली.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरीविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तामीळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटका, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड या 10 या राज्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या 10 राज्यांसाठी एकूण 26,13,568 घरे मंजूर केलेली आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून एकूण 40,597 कोटींची आर्थिक सहाय्यतेला मंजूरी मिळाली आहे, तर 1,39,612 कोटी रूपयांचा निधी गुतंवणूकीसही मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.   


  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

No comments:

Post a Comment