राजधानी
दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही
गणरायांचे
उत्साहात आगमन
नवी दिल्ली,नवी दिल्ली , 25 : महाराष्ट्र
सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र
सदनात शुक्रवारी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दिल्लीच्या
वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची
प्रतिष्ठापणा करण्यात आली.
महाराष्ट्राच्या
कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव
महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला आणि
राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी गणरायाची सपत्निक पुजा
केली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु सिंधू अजितसिंह नेगी यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे
अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त मोठया
संख्येन उपस्थित होते.
तत्पूर्वी,
आज सकाळी येथील कोपरनिक्स मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.
“गणपती बाप्पा मोरया”, “मंगल
मूर्ती मोरया” या घोषणा, ढोल ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरणात
भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पुजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची
प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी
परिक्षेत्रातील जवळपास ३६ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा
करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र
साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो
करा :
http://twitter.com/micnewdelhi
No comments:
Post a Comment