Saturday 19 August 2017

राजधानीत सदभावना दिन साजरा










नवी दिल्ली, 19 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सदभावना दिन साजरा करण्यात आला.

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिन म्हणून साजरा करण्यात येते. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनामी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन...अशी प्रतिज्ञा दिली. यावेळी श्रीमती शुक्ला यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचा-यांनी  स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

                         महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिनाची प्रतिज्ञा
महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सदभावना दिनाची प्रतिज्ञा दिली. श्री.कांबळे यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. 

0000

No comments:

Post a Comment