नवी दिल्ली,
23 : मुंबईतील
दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४० एकर जमीन मेट्रो रेल्वेच्या कारशेड
उभारणीसाठी मुंबई महानगर विकास
प्राधिकरणाला(एमएमआरडीए) हस्तांतरीत
करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या केंद्रीय कॅबीनेटच्या बैठकीत अटी व
शर्तींच्या अधिन राहून जमीन हस्तांतरणास
मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४०
एकर जमीन मेट्रो रेल्वेच्या कारशेड उभारणीसाठी एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. याबदल्यात
महाराष्ट्र शासन मुंबईतील गोराई येथील राज्यशासनाच्या मालकीची जमीन भारतीय विमानतळ
प्राधिकरणाला हस्तांतरीत करणार आहे.
महाराष्ट्र शासनाने मुंबईत सार्वजनिक वाहतूक बळकट
करण्यासाठी विविध टप्यांमध्ये जवळपास
१४६.५० कि.मी. अंतराचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारत आहे. मुंबई मेट्रोसाठी
एमएमआरडीच्या अख्त्यारीत स्वतंत्र मुंबई मेट्रो रेल मंडळ(एमएमआरसी) स्थापन करण्यात आले आहे. एमएमआरसी दहीसर पूर्व आणि अंधेरी पूर्व कॉरीडॉर दरम्यान
मेट्रो शेड उभारणार आहे यासाठी भारतीय विमातळ प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर हे
कारशेड उभारण्यास जमीन हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली आहे. दहीसर परिसरात भारतीय
विमातळ प्राधिकरणाच्या रिमोट रिसीव्हींग स्टेशनची ६४ एकर जागा आहे. यातील मेट्रो
कारशेड साठी जवळपास ४४ एकर जागा चिन्हीत करण्यात आली आहे.
रोजगार
निर्मितीची मोठी संधी
दहीसर मेट्रोरेलच्या कारशेड
उभारणीमुळे मेट्रो बांधणीशी निगडीत निर्मिती क्षेत्रात कुशल कामगार, अर्ध कुशल
कामगार यांच्यासह तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मेट्रो
कारशेड उभारणीनंतर प्रत्यक्ष कार्यान्वयना दरम्यान मोठया प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार
उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000000
No comments:
Post a Comment