नवी दिल्ली, 24 :
महाराष्ट्र परिचय केंद्राचे ग्रंथालय समृद्ध तसेच संदर्भपूर्ण असल्याचे गौरवद्गार विधान परिषदेचे आमदार हरीभाऊ राठोड यांनी काढले.
श्री राठोड यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली.
यावेळी श्री राठोड यांनी परियच केंद्राच्या ग्रंथालयाचे कौतुक केले. परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यावेळी
उपस्थित होत्या.
परिचय
केंद्राचे ग्रंथालय महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या
संकल्पनेतून उभारण्यात आलेले असल्यामुळे येथे संदर्भ ग्रथांचा समृद्ध ठेवा
असल्याचे श्री राठोड ते म्हणाले. आजच्या काळानुरूप विविध विषयांवर आणखी नवनवीन पुस्तके ग्रंथालयात आहेत,
ग्रंथलायातील सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढीत आहे, तसेच आज 25 हजारच्यावर पुस्तके
ग्रंथालयात असल्याचे श्री कांबळे यांनी श्री
राठोड यांना यावेळी सांगितले.
यासह महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत
राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि
प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी श्री राठोड यांना दिली. महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या कामाबद्दल श्री राठोड यांनी यांनी समाधान व्यक्त केले तसेच शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
No comments:
Post a Comment