Monday, 16 October 2017

कामठी छावणी परिषदेतील जागा महाराष्ट्र शासनाला मिळणार : चंद्रशेखर बावनकुळे





नवी दिल्ली  दि.16 :  कोराडी-कामठी येथे संरक्षण विभागाची 8.87 हेक्टर जागा आहे. ही जागा महाराष्ट्र शासनाला देऊन  या जागेच्या बदल्यात अहमदनगर येथील जाभूळवन येथे संरक्षण विभागाला 34 हेक्टर जागा देण्याचा, थकीत असणारा प्रश्न लवकच सुटणार असल्याची माहिती,राज्याचे ऊर्जा मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

          आज संरक्षण मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेत कामठी छावणी परिषद आणि संरक्षण विभागाच्या अंतर्गत येणा-या नागपूर जिल्ह्यातील जागांविषयी महत्वपुर्ण बैठक झाली. यावेळी  श्री चंद्रशेखर बावनकुळे, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

1947 च्या अधिसूचनेनुसार कोराडी येथील 8.87 हेक्टर जमीन संरक्षण विभागातंर्गत येते. मात्र, या जमीनीचा कुठलाही वापर संरक्षण विभागाकडून केला जात नाही. त्यामुळे ही जमीन महाराष्ट्र शासनाला देण्यावर तत्वत: मान्यता मिळाली आहे.  या संदर्भात अंतीम निर्णय झालेला नसून पुढील काही दिवसात निर्णय होईल, असे श्री बावनकुळे यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग 7 चे काम सुरू ठेवावे : केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री

कामठी छावणी परिषदमार्गातून राष्ट्रीय महामार्ग 7 चे काम सुरू असून हा परिसर छावणीमध्ये येत असल्यामुळे संरक्षण विभागाने येथे काम करण्यास मनाई केली होती. मात्र, आज झालेल्या बैठकीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी संबधित अधिका-यांना निर्देशित केले असून हे काम यापुढे सुरू राहील. यामध्ये काही समस्या निर्माण झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संरक्षण विभागाचे संबधित अधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी बसून चर्चा करून मार्ग काढतील, असेही श्री भामरे यांनी निर्देशित केले.


छावणी परिषदेतील गोळी प्रशिक्षण केंद्राची योग्य सुरक्षा असावी : श्री बावनकुळे

कामठी छावणी परिषदेतील गोळी प्रशिक्षण केंद्रामध्ये सैनिक दररोज  सराव करीत असतात. या सरावा दरम्यान ब-याच वाईट घटना घडलेल्या आहेत. याकडे लक्ष केंद्रीत करून या ठीकाणची सुरक्षा वाढवीण्याची विनंती, श्री बावनकुळे यांनी केली. यावर लवकरच योग्य कारवाईचे आश्वासन , केंद्रीय संरक्षण  राज्यमंत्री श्री भामरे यांनी दिले.

कामठी छावणी परिषदेला महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा करेल : श्री बावनकुळे

कामठी छावणी परिषदेतील परिसरातील पीण्याच्या पाण्याची सोय ही महाराष्ट्र शासन करेल असे, आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले. संरक्षण विभागाच्यावतीने या संदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास कामठी छावणी परिषदेतील  पीण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल.

संरक्षण विभागाच्या काही ठिकाणचे सौदर्यंकरण करण्याची परवानगी मिळावी :
                                                                          पालकमंत्री

नागपूर जिल्ह्यांतील विविध जागा या संरक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. यामध्ये कामठी छावणी परिषदच्या परिसरातील महादेव घाट, शांती घाट, भारताचे मध्य ठिकाण असलेले झीरो माईलया ठीकाणचे सौदर्यंकरण करण्याची  परवानगी मिळावी, अशी मागणी पालकमंत्री यांनी केली.

कामठी छावणी परिषद परिसरात महादेव घाट, शांती घाट हे स्थानीक जनतेचे तीर्थ स्थळ आहेत. सण महोत्सवाच्या काळात याठीकाणी लोकांची प्रचंड गर्दी असते. याकरिता याठीकाणचे सौदर्यंकरण झाल्यास जनतेची  उत्सावाच्या वेळी  सोयी होईल. तसेच हे ठीकाण पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्वपुर्ण असल्यामुळे याचे सौदर्यंकरण होणे गरजेचे असल्याचे, श्री बावनकुळे यांनी सांगितले.
यासह भारताच्या मध्यभाग असणारे  झीरो माईल जेथून संपूर्ण भारताचे किलोमीटर मोजले जाते. याचेही सौदर्यंकरण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन याची काळजी आणि याचे  सौदर्यंकरण करू इच्छिते संरक्षण विभागकडून याची परवानगी मिळाल्यास काम सुरू करता येईल, असे श्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment