Tuesday, 21 November 2017

“महाराष्ट्र खाद्यो बहुत स्वादिष्ट थिला” उडिया खवय्यांनी घेतला महाराष्ट्रीय व्यंजनांचा आस्वाद







नवी दिल्ली, 21 : पुरण पोळीझुनका भाकरचिकन कोल्हापुरी आदी महाराष्ट्रीय व्यंजनांचा आस्वाद घेणा-या उडिया खवय्यांची बोलकी प्रतिक्रिया होती महाराष्ट्र खाद्यो बहुत स्वादिष्ट थिला अर्थात महाराष्ट्राचे भोजन खुप स्वादिष्ट आहेप्रसंग होता येथील ओडिशा भवनात ओयाजित महाराष्ट्र अन्न महोत्सवाचा.
एक भारत श्रेष्ठ भारत या सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत आज येथील ओडिशा भवनात पुरणपोळीसह महाराष्ट्राचे व्यंजन खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन ओडिशा भवनाचे मुख्य निवासी आयुक्त डॉ. सुशील कुमार भार्गव आणि सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी केलेयावेळी गुतंवणूक्‍ तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्रअपर निवासी आयुक्त समीर सहायसहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा तसेच ओडिशा भवनाचे निवासी आयुक्त संजीव मिश्रासहायक निवासी आयुक्त टीप्रधान आणि  सह निवासी आयुक्त रिता महापात्रा यांच्यासह दिल्ली स्थित ओडिशा राज्याचे प्रशासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने देशभर राबविण्यात येत आहे. देशातील राज्या-राज्यांमधे सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून संबंध  दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या भवनांमध्येही या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील व्यंजनांचा आस्वाद ओडिशा भवन येथील अधिकारी- कर्मचारी , भवनातील पाहुणे व आगंतुकांसह दिल्लीकरांनी आज घेतला

डिसेंबर ला महाराष्ट्र सदनात उडिया अन्न महोस्त्वडॉसुशील कुमार भार्गव
एक भारत श्रेष्ठ भारत’ या कार्यक्रमाअंतर्गत्‍ ओडिशा भवनातील आजचा ‘महाराष्ट्र अन्न महोत्सव’ यशस्वी झाला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून उभय राज्यांतील खाद्य संस्कृती समजून घेता येईल व पर्यायाने सांस्कृतिक संबंधही दृढ होतील. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून 5 डिसेंबर 2017 ला कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ‘उडिया अन्न महोस्त्व’ आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती ओडिशा भवनाचे मुख्य निवासी आयुक्त डॉ. सुशील कुमार भार्गव यांनी दिली.

येथील चाणक्यपुरी भागातील बार्डोलोई मार्ग स्थित ओडिशा भवनाच्या हिरवळीवर  आज खवय्यांसाठी खास महाराष्ट्रीय व्यंजनांची मेजवाणी देण्यात आली. देलिना महापात्रा यांनी महाराष्ट्राची फिश फ्राय,चिकन कोल्हापुरीचा आस्वाद घेतला. यानंतर त्यांनी  दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. त्या म्हणतात,महाराष्ट्रीयन व्यजंने खुपच चविष्ट व रुचकर आहेत. विशेषत: आम्हाला फिश फ्राय , चिकन कोल्हापुरी ही व्यजंने फार आवडली.  अधिशंकर अलांग म्हणतातउडिया आणि महाराष्ट्रीय व्यजंनामध्ये मला बरेच साम्य आढळतेमला पुरणपोळी  आणि श्रीखंड ही गोड पदार्थ फारच आवडलीतसेच झुनका भाकरसावजी पनीर ही व्यजंनेही फार आवडली.
             महाराष्ट्र अन्न महोत्सवात ही व्यजंन ठरली खास

या अन्न महोत्सवात राज्यातील  व्यजंनांनी खास  वाहवाही मिळवीली. पुरणपोळी, श्रीखंड, झुनका-भाकर, भरली वांगी, भरली भेंडी, दाल कोल्हापुरी, सावजी पनीर, मसाले भात, चिकन कोल्हापुरी, फीश फ्राय, सोलकडी ही व्यजंने उडिया खवय्यांच्या पसंतीस उतरली.    
                                   
                                       लोकराज्य अंक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद
 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणारे राज्य शासनाचे मुखपत्र लोकराज्य अंकाचे प्रदर्शनही या महोत्सवात लावण्यात आले, यास उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी  लोकराज्य या मराठी अंकासह महाराष्ट्र अहेडहा इंग्रजी भाषेतील अंक आणि  हिंदी भाषेतील लोकराज्य अंकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.  
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                               http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment