नवी दिल्ली, २२ : प्रगती मैदान येथे
सुरु असलेल्या ३७ व्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१७
रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होनार आहे. या
कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शण घडणार आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय
व्यापार मेळा २०१७ ला १४ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. या मेळाव्यात दररोज
सायंकाळी ‘हंसध्वनी सभागृह’ येथे व्यापार मेळाव्यात सहभागी देश
व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमाअंतर्गत दिनांक
२३ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता. येथील हंसध्वनी सभागृहात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन सचिव तथा
निवासी आयुक्त आभा शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई येथील ‘हृदया आर्ट गृप’ चे ४० कलाकार यावेळी ‘एक माती अनेक नाती’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर
करणार आहेत.
००००
No comments:
Post a Comment