नवी
दिल्ली, २० : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेअंतर्गत २१ नोव्हेंबर २०१७ रोजी येथील ओडिशा भवनात ‘पुरणपोळी’सह महाराष्ट्राचे व्यंजन खवय्यांसाठी
उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, २४ नोव्हेंबर २०१७ ला येथील महाराष्ट्र सदनात
ओडिशाच्या ‘चेना तरकारी’सह महत्वाची
व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
संकल्पनेतून साकार झालेली ‘एक भारत श्रेष्ठ भारत’
ही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ३१ ऑक्टोबर
२०१७ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीदिनापासून देशभर राबविण्यात येत आहे. देशातील
राज्या-राज्यांमधील दुरावा कमी होऊन सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून
संबंध दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा मूळ
उद्देश आहे. देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासीत प्रदेशांमध्ये असा कार्यक्रम
राबविण्यात येत आहे. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या भवनांमध्येही या कार्यक्रमांतर्गत
विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि ओडिशा या
राज्यांतील व्यंजनांचा आस्वाद ओडिशा भवन व महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी व
येथील पाहुणे व आगंतुकांसह दिल्लीकरांना घेता येणार आहे.
येथील चाणक्यपुरी भागातील बार्डोलोई मार्ग स्थित ओडिशा
भवनातील उपहारगृहात २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पासून महाराष्ट्रीय व्यंजन
उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुरणपोळी, श्रीखंड, झुनका-भाकर, भरली वांगी, भरली
भेंडी, दाल कोल्हापुरी, सावजी पनीर, मसाले भात, चिकन कोल्हापुरी, फीश फ्राय,
सोलकडी आदी व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे.
याच उपक्रमाअंतर्गत दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ रोजी येथील इंडियागेट
भागातील कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात दुपारी १२ वाजता पासून दिवसभर
ओडिशाचे व्यंजन उपलब्ध होणार आहेत. यात
मुख्यत्वे चेना तरकारी, धांटो मिक्स व्हेज, बडी चुरा, फेना कोंडा, चटणी या
शाकाखारी व्यंजनांसह चोखली मांसो, मासो बेसर, मटन ही मांसाहारी व्यंजन उपलब्ध
होणार आहेत याशिवाय, ओरिया राईस, रसगुल्लाही येथे खवय्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत
व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
No comments:
Post a Comment