नवी दिल्ली, ११ : मुंबई येथील गुरुनानक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सोमवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या या २१ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी राज्यशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक सुमीत खरात यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. खरात यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी झालेल्या औनचारिक वार्तालापामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींची माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर गुरुनानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक सुमीत खरात यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment