नवी
दिल्ली, ८ : नागपूरच्या
कांचनमाला पांडे हीने मेक्सिको येथे सुरू असलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग
चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदक
मिळवणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली असून तिची ही ऐतिहासिक कामगिरी आहे.
पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धा २०१७
मध्ये एस-११ श्रेणीत २०० मीटर इंडीव्युजल मिडले प्रकारात कांचनमालाने सुवर्ण
पदकाला गवसणी घातली. कांचनमाला ही भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू
होती. या स्पर्धेतील इतर प्रकारात तिला थोडक्यात अपयश आले. १०० मीटर फ्रिस्टाईल
प्रकारात तिला पदकाने हुलकावणी दिली. ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक प्रकारात तिला
पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.
जन्मांध असणा-या कांचनमालाने हे जग बघीतले नाही मात्र जगाला तिच्या
कार्याचा हेवा वाटावा अशी तिची कामगिरी आहे. कांचनमाला ही मुळची अमरावतीची.
अमरावती मध्यवर्ती कारागृहाशेजारील आनंद
स्टेट बँक कॉलनीत तीचे वास्तव्य. कांचनमाला
ने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरवीले.
कांचनमालाने जलतरण
स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली व मग तिने मागे वळून पाहीलेच नाही. ती यशा
मागून यश पदरात पाडत होती. तीने जवळपास १० हून अधिवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर
भारताचे प्रतिनिधीत्व केले यात मुख्यत्वे. कॉमनवेल्थ गेम २००६, एशियन गेम २००६,
जर्मन ओपन स्विमींग चॅम्पीयनशिप २००८, एशियन गेम २०१० चिन, वर्ल्ड गेम २०११
तुर्की, डॅनीश ओपन स्विमींग चॅम्पीयनशिप २०१२. ज्यात तिने १० हून अधि सुवर्ण तर ५
रजत पदक पटकाविली आहे. अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिप मध्ये तिने जवळपास
१०० हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. कांचनमाला ही दहावी व बारावी मध्ये ७५
टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
पदवी शिक्षण पूर्ण करीत असतानाच ती बँकींगची तयारी करित होती. रिजर्व बँक ऑफ
इंडियाच्या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली व बँकेच्या नागपूर शाखेत गेल्या २
वर्षांपासून सहायक पदावर कार्यरत आहे.
जलतरणासाठी वडील ज्ञानेश्वर पांडे, प्रशिक्षक लक्ष्मीकांत खंडागळे आणि पती विनोद देशमुख यांनी कांचनमालाला सतत योग्य
मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
कांचनमाला ४ धाकटया बहीणी व १
धाकटा भाऊ आहे. यापैकी जयमाला ही हॉकी खेळते व ती राष्ट्रीय चॅम्पीयन आहे. दिपमाला
व राजमाला याही जलतरणपटू आहेत व त्यांनी जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर
सुवर्ण पदक मिळविली आहेत. सर्वात धाकटा भाऊ अक्षय हा वाटरपोलो खेळतो व तो
वाटरपोलोचा राष्ट्रीय खेळाडू आहे.
कांचनमालाचे
वडील श्री. ज्ञानेश्वर पांडे यांनी या मुलांना पांरपारिक शिक्षणासोबतच खेळासाठी
प्रोत्साहन दिले आणि पदोपदी मुलांच्या पाठीशी उभे राहिले आहे. कांचनची आई हिरूताई
पांडे याही लंगडी आणि आटयापाटया या देशी खेळांमध्ये अग्रेस होत्या. त्यांनीही
मुलांना घडविण्यात मोलाची जबाबदारी उचलली आहे.
000000
No comments:
Post a Comment