नवी
दिल्ली, ६ : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिवार्णदिनी आज संसद भवनात आदरांजली
वाहिली.
येथील
संसद भवनात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिवार्णदिना निमित्त
आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व
सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ॲड. सुलेखा
कुंभारे यांच्यासह गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
No comments:
Post a Comment