नवी दिल्ली, 5 : ‘प्रधानमंत्री उज्ज्वला
योजने’अंतर्गत
देशात 3 कोटीहून अधिक गॅस जोडणी करण्यात आली आहे. जानेवारी
2018 पर्यंत महाराष्ट्रात 17 लाखाहून
अधिक गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत.
देशातील दारिद्रय
रेषेखालील कुटुंबातील महिलांना गॅस जोडणी देणा-या ‘प्रधानमंत्री उज्ज्वला
योजनेचा’ शुभारंभ प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी 1
मे 2016 रोजी केला. देशातील 5 कोटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला एलपीजी गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट
ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात या
योजनेचा शुभारंभ ऑक्टोबर 2016 मध्ये झाला. गेल्या 15 महिन्यांच्या कालावधीत राज्यात 17 लाख 12 हजार 425 गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. मार्च 2017
अखेर महाराष्ट्रात 8 लाख 58 हजार
808 कनेक्शन देण्यात आली होती, गेल्या 10
महिन्यात सुमारे 9 लाख गॅस कनेक्शन देण्यात
आली आहेत.
*****
No comments:
Post a Comment