Friday 5 January 2018

महाराष्ट्रात 2 कोटी एलईडी बल्बचे वितरण


                     
नवी दिल्ली, 5 :  ऊर्जा बचतीसाठी एलईडी बल्ब हा एक पर्याय आहे, केंद्र शासनाने यासाठी धोरण आखले आहे. आजपर्यंत देशात 28 कोटीहून अधिक एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे, महाराष्ट्रात 2 कोटीहून अधिक बल्ब चे वितरण करण्यात आले.

केंद्र शासनाने देशात ऊर्जा बचतीच्या उद्देशाने एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उजाला योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वितरण केंद्र उघडण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 2 कोटी 16 लाख 21 हजार 382 इतक्या एलईडी बल्ब चे वितरण करण्यात आले आहे. तर 92 हजार 769 एलईडी ट्यूब लाईट चे वितरण करण्यात आले आहे. 

                                          पुणे जिल्ह्यात 34 लाख बल्ब चे वितरण 
एलईडी बल्ब वितरणात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्यात एकूण 34 लाख 18 हजार बल्ब चे वितरण झाले आहे,पुणे शहरी भागात 29 लाख 74 हजार 72 तर पुणे ग्रामीण भागात 4 लाख 33 हजार 933 इतक्या बल्ब चे वितरण झाले आहे. 
           
                                              विदर्भात 71 लाख बल्ब चे वितरण

विदर्भातील 11 जिल्ह्यात 71 लाख 77 हजार 803 एलईडी बल्बचे वितरण झाले आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 14 लाख 15 हजार तर अकोला जिल्ह्यात 9 लाख 59 हजार बल्ब वितरित झाले आहेत. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये गोंदिया - 2 लाख 19 हजार 930, भंडारा- 1 लाख 84 हजार, वर्धा- 4 लाख82 हजार, गडचिरोली- 2 लाख 98 हजार 994, चंद्रपूर- 4 लाख 56 हजार 414, अमरावती- 8 लाख 75 हजार 300, यवतमाळ- 5 लाख 64 हजार 599, वाशीम- 8 लाख 62 हजार व बुलडाणा जिल्ह्यात- 8 लाख 59 हजार 752 इतक्या बल्ब चे वितरण झाले आहे. 

मराठवाड्यात 21 लाख एल ई डी बल्ब वितरित

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 21 लाख 8 हजार 942 एल ई डी बल्ब वितरित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात 8 लाख 6 हजार 933 तर नांदेड जिल्ह्यात 3 लाख 84 हजार 542 इतके बल्ब वितरित झाले आहेत. उस्मानाबाद- 1 लाख 9 हजार 533, जालना- 2 लाख 60हजार 460, लातूर- 1 लाख 90 हजार 565, परभणी- 1 लाख 71 हजार 531, हिंगोली- 99 हजार 671 तर बीड जिल्ह्यात 85 हजार 707 बल्ब वितरित झाले आहेत.
                                                             मुंबईत 9 लाख बल्ब वितरित

मुंबईत 9 लाख 54 हजार 684 इतके बल्ब वितरित झाले आहेत, राज्यातील इतर जिल्ह्यात एलईडी बल्ब चे वितरण पुढीलप्रमाणे-  कोल्हापूर- 12 लाख 53 हजार,सांगली- 1 लाख 43 हजार, सोलापूर- 8 लाख 21 हजार, सिंधुदुर्ग- 3 लाख 71 हजार, रत्नागिरी- 4 लाख 61 हजार, सातारा- 3 लाख 60 हजार, नाशिक- 5 लाख 70 हजार, जळगाव- 7 लाख 67 हजार, अहमदनगर- 3 लाख 87 हजार, धुळे- 1 लाख 35 हजार, ठाणे- 4 लाख 70 हजार, कल्याण- 77 हजार, भिवंडी- 1 लाख 86 हजार, वाशी- 4 लाख 21 हजार. 

एलईडी  बल्ब मुळे दरवर्षी राज्याची 28 लाख मेगावॅट वीज बचत होणार आहे तर 1123 कोटी रुपयांची बचतही या मुळे होणार आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा. http://twitter.com/MahaGovtMic

                                                            *****

No comments:

Post a Comment