Thursday 25 January 2018

नाशिकचे वीरपुत्र मिलींद खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र





नवी दिल्ली 25 : नाशिकचे वीर जवान मिलींद खैरनार यांनी दाखविलेल्या अदम्य साहस व विलक्षण धाडसाची दखल घेत त्यांना आज मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

संरक्षणमंत्रलयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सेना दलाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीर मध्ये बांदिपोरा जिल्हयात राष्ट्रीय रायफलचे जवान खैरनार यांनी १० ऑक्टोबर २०१७ च्या रात्री झालेल्या दशतवादी हल्यामध्ये जिकराने लढा दिला. हाजीन गावामध्ये रात्री झालेल्या शोध मोहिमेत त्यांनी भाग घेतला. या शोध मोहिमे दरम्यान ११ ऑक्टोबर २०१७ च्या मध्यरात्री पाच ते सहा दहशतवाद्यांनी अचानक या जवानांनावर हल्ला चढवला. याला प्रत्युत्तर खैरनार यांनी कडवा प्रतिकार केला, त्यांनी एका दहशतवाद्याला ठार मारले. या चकमकीत खैरनार यांना गोळी लागून ते घायल झाले व त्यांचा मृत्यू झाला.

खैरनार यांनी अदम्य साहस दाखवत दहशतवाद्यांचा केलेला प्रतिकार व भारत भूमीच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलीदानासाठी त्यांना मानाचे शौर्यचक्र आज जाहीर झाले. मिलींद खैरनार हे मुळचे नंदुरबार जिल्हयातील बोराळा तालुक्यातील रनाळे येथील रहीवाशी तर नाशिक येथे स्थायिक होते.

No comments:

Post a Comment