नवी दिल्ली, 26 : पुण्यातील
पिंपरी चिंचवड येथील टाटा मोर्टस मधील 5
कामगारांना ‘प्रधानमंत्री श्रम’
पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु यांच्याहस्ते आज विज्ञान भवनातील एका शानदार
सोहळयात प्रदान करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्यावतीने या कार्यक्रामाचे आयोजन
करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय कामगार
व रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार तसेच वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते. आज
आयोजित कार्यक्रमात वर्ष 2011 ते 2016 पर्यंतच्या पुरस्कारांचे वितरण आज करण्यात
आले. ‘श्रम वीर’ या पुरस्कारासाठी 60, हजार रूपये
रोख, ‘श्रम श्री’ पुरस्कारासाठी 40
हजार रूपये रोख आणि ‘सनद’ प्रदान करण्यात आली.
पिंपरी चिंचवड येथील टाटा
मोर्टसमधील 5 कामगांराना यावेळी गौरिविण्यात आले. यामध्ये डॉ. वसंत भांदुर्डे यांना वर्ष 2012 साठी ‘श्रम वीर’ या पुरस्काराने स्नमानित करण्यात आले. श्री भादुर्डे हे विद्युत
देखभाल या पदावर कार्यरत आहेत. टाटा मोर्टसमध्ये ते 25 वर्षापासून कार्यरत आहेत. पुरस्कार
मिळाल्याचा आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कैलास माळी हे देखील मागील 24
वर्षापासून टाटा मोर्टसमध्ये कार्यरत असून ते ही विद्यूत देखभाल या पदावर कार्यरत आहेत.
त्यांना वर्ष 2014 साठी चा ‘श्रम श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्यावरणाला
पुरक अशा उपाय योजना राबविण्याबाबत आपल्याला हा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी
सांगितले.
हा पुरस्कार मिळाल्यामुळे आयुष्यात मोठी कमाई
केली, असल्याची प्रतिक्रिया राकेश देशमूख
यांनी व्यक्त केली. त्यांना वर्ष 2012 चा ‘श्रम श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेल्डर
म्हणून मागील 25 वर्षापासून ते टाटा मोर्टसमध्ये कार्यरत
आहेत. त्यांनी तब्बल दिड कोटी रूपयांच्या विजेची बचत केली आहे. यासह कंपनीतील इंधनाची मोठी बचत केलेली आहे. यासह गर्जेद्र
निंबाळकर यांना वर्ष 2011 चा ‘श्रम श्री’ पुरस्कार मिळाला ते फिटर या पदावर मागील
26 वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच मनोज कुमार आणेकर यांना वर्ष 2016 चा ‘श्रम श्री ’ पुरस्कार प्राप्त झाला ते मिली राईट
मेकॉनिक या पदावर मागील 24 वर्षांपासून कार्यरत आहेत
No comments:
Post a Comment