Monday 26 February 2018

सृजन’ कार्यक्रमांतर्गत नागपूर व पुणे रेल्वे स्थानक














         

नवी दिल्ली, २६ : सर्वांच्या सहकार्यांतून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अर्थात सृजन या रेल्वे मंत्रालयाच्या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आराखडा तर एकात्मीक व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाची निवड करण्यात आली आहे.
             रेल्वे मंत्रालयाच्या भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ लिमीटेडच्यावतीने २६ जानेवारी २०१८ रोजी देशातील ६३५ महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सृजन हा कार्यक्रम MyGov पोर्टलवर सुरु करण्यात आला. भागधारक, रेल्वे प्रवासी, शहर नियोजनकर्ते , वास्तुविषारद,  अभियंते  यांच्या सहभागातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
            सृजन कार्यक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आरखडा तयार करण्याकरिता आयोजित स्पर्धेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. नागपूर सह ग्वालीयर आणि बयप्पनहल्ली या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. या स्पर्धेचा दुसरा टप्पा ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे.
देशातील ५ रेल्वे स्थानकांसाठी एकात्मीक व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून पुणे रेल्वे स्थानकाचा यात समावेश आहे. यासाठी खाजगी संस्थांकडून निवीदा मागविण्यात आल्या आहेत. पुणे सह चंदिगड, आनंदविहार (दिल्ली), सिकंदराबाद, बेंग्लुरू  रेल्वे स्थानकांचा या कार्यक्रमात समावेश आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment