Monday, 26 February 2018

मराठी भाषादिनानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन




नवी दिल्ली, २६ : मराठी भाषादिनानिमित्त दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्रात कलावंत व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि लेखक वसंत लिमये यांच्या प्रकट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.   
          आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजता कलावंत व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून मुक्त पत्रकार निवेदिता वैशंपायन मुलाखत घेणार आहेत. नुकतेच दिल्लीतील राष्ट्रीय नाटय शाळेच्या वतीने आयोजित ८ व्या थियेटर ऑल्म्पीक मध्ये प्राजक्त देशमुख लिखीत  व दिग्दर्शीत संगीत देव बाभळीनाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यास श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. श्री. देशमुख यांना राज्यपातळीवरील अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचा  वर्ष २०११ व २०१२ चा उत्कृष्ट कलाकार व दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ५० व ५१ व्या महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धा नाशिक विभागातून त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शक व प्रकाश संयोजनाचा पुरस्कार मिळाला आहे.
            मराठी भाषादिना निमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजता लेखक वसंत लिमये यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून अनुवादिका हेमांगी नानीवडेकर या मुलाखत घेणार आहेत. मुळचे पुणे येथील लेखक वसंत लिमये यांची लॉच ग्रीफींग, विश्वस्त, धुंद- स्वच्छंद आणि कॅम्प फायर ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दैनिक लोकसत्ता मधून त्यांनी कथा लेखन केले आहे.       
         
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     00000



No comments:

Post a Comment