नवी दिल्ली, ८ : लातूर येथील दैनिक यशवंत चे संपादक डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. मोतीपवळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री. कांबळे यांनी परिचय केंद्राच्या कार्याविषयी माहिती दिली. परिचय केंद्राच्यावतीने शासनातील जनसंपर्क विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा, शासनाच्या जनसंपर्कासाठी कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला प्रभावी उपयोग याविषयी त्यांनी माहिती दिली. याशिवाय दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाचा पुढाकाराबाबतही माहिती दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन डॉ. मोतीपवळे यांनी माहिती जाणून घेतली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
No comments:
Post a Comment