नवी दिल्ली, १५ : देशात ४ लाख ३२ हजार ५३८ कोटींची राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असून यात सर्वात जास्त २६ हजार ८४१ कोटींची १०७ कामे महाराष्ट्रात सुरु आहेत.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री मनसुखलाल मांडविया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. देशातील राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे एकूण १ हजार ४७० प्रकल्पांचे कामे सुरु आहेत. या अंतर्गत एकूण ४ लाख ३२ हजार ५३८ कोटी खर्चातून ४४ हजार १०८ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. यात सर्वात जास्त १०७ प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. राज्यात २६ हजार ८४१ कोटी खर्चातून ३ हजार ३२० कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु आहे.
महाराष्ट्राशिवाय कर्नाटकात ४ हजार ७४९ कोटींचे ८३ प्रकल्प, उत्तराखंडमध्ये ४ हजार ८२७ कोटींचे ६१ प्रकल्प, हिमाचल प्रदेश १ हजार ३६ कोटींचे ४७ प्रकल्प, तामीळनाडूमध्ये १ हजार ३२० कोटींचे ४६ प्रकल्प आणि बिहार मधील ५ हजार १०६ कोटींचे ४३ प्रकल्पांसह देशातील ३० राज्य व केंद्रशासीत प्रदेशांचा यात समावेश आहे.
No comments:
Post a Comment