नवी दिल्ली दि. ४: पायाभूत सुविधा
निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. गेल्या चार वर्षात
राज्यात २८४ पायाभूत प्रकल्प मंजूर झाले असून या प्रकल्पाची किंमत १ लाख ४३ हजार
७३६ कोटी इतकी आहे.
केंद्र
शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची ३१ मार्च २०१८ अखेर
पर्यंतची माहिती जाहीर केली आहे. या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये शासकीय पायाभूत
सुविधा प्रकल्प,सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी
भागीदारी प्रकल्प व शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. ५ ते ५० कोटीहुन
अधिक किमतीच्या पायाभूत प्रकल्पांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्रात २८ वर्षात ११४४
पायाभूत सुविधा प्रकल्प
केंद्रीय
आर्थिक व्यवहार विभागाने सन १९९० पासूनच्या देशातील पायाभूत प्रकल्पांची माहिती
संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. गेल्या २८ वर्षात देशात ५४ लाख ६५ हजार कोटी
किमतीचे ९०६८ पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले, या तुलनेत
महाराष्ट्रात ६ लाख १९ हजार कोटींचे ११४४ पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे हाती
घेण्यात आली. महाराष्ट्र पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अव्वल ठरले असून
उत्तरप्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे, या राज्यात ३ लाख ४३ हजार
कोटींचे ५४४ प्रकल्प हाती घेण्यात आले, गोवा हे राज्य
पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसऱ्या स्थानावर आहे,या
राज्यात ३ लाख २५ हजार कोटी किमतीचे ४६ प्रकल्प हाती घेण्यात आले. अरुणाचल प्रदेश
चौथ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र चार वर्षात २८४
पायाभूत सुविधा प्रकल्प
राज्यात
गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे हाती घेण्यात
आली आहेत. सन २०१४ ते २०१८ या पाच वर्षात १ लाख ४३ हजार ७३६ कोटी किंमतीचे
२८४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
वर्षनिहाय पायाभूत सुविधा
प्रकल्पाची कामे
महाराष्ट्रात
सन २०१४-१५ या वर्षात २१ हजार ५७९ कोटी ९१ लाख किमतीचे ९८ प्रकल्प हाती घेण्यात
आली. २०१५-१६ या वर्षात ३२ हजार ९७६ कोटी ७३ लाख रुपयांचे ८२ प्रकल्प. सन २०१६-१७
या आर्थिक वर्षात ६० हजार २७० कोटी ७१ लाख किमतीचे ८२ प्रकल्प तर २०१७-१८ या
वर्षात २८ हजार ९०९ कोटी रुपयांचे ४१ पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले
आहेत.
गेल्या
चार वर्षात देशात १५ लाख ८२ हजार कोटी किमतीचे ३४७० पायाभूत सुविधा प्रकल्पांची
कामे हाती घेण्यात आली,
यामध्ये इतर राज्यांचा तुलनेत सर्वाधिक १ लाख ४३ हजार ७३६ कोटी
किमतीचे २८४ प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. गेल्या २८ वर्षात सरासरी वर्षाला ४०
पायाभूत सुविधा प्रकल्प राज्यात हाती घेण्यात येत होते, या
तुलनेत गेल्या चार वर्षात प्रतिवर्षं ७१ पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात
येत आहेत.
आम्हाला
ट्विटरवर फॉलो करा
http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment