नवी दिल्ली, 7
: ऐतिहासिक लाल किल्यावरून हिंदी भाषेत ‘श्री. राजा शिवछत्रपती गौरवगाथा’ या महानाट्यास सुरुवात
झाली असून महानाटयाच्या माध्यमातून कुशल प्रशासक
व प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जाणून घेण्यासाठी दिल्लीकरांमध्ये
मोठा उत्साह बघायला मिळत आहे.
राजा शिवछत्रपती महानाट्य आयोजन समितीच्यावतीने दि. 6 ते 10
एप्रिल 2018 दरम्यान, लाल किल्यासमोरील माधवदास पार्क येथे या महानाटयाचे आयोजन करण्यात
आले आहे. शुक्रवारी 6 एप्रिल रोजी केंद्रीय
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्या
हस्ते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री मनसुखभाई मांडविया, केंद्रीय वित्त राज्यमंत्री
पी. राधाकृष्णन आणि महानाटयाचे निर्माते महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
यांच्या उपस्थितीत महानाटयाचे उदघाटन झाले.
11 एप्रिल रोजी
होणार महानाटयाचे सादरीकरण
दिल्लीत शुक्रवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली त्यामुळे उदघाटनानंतर
केवळ 10 मिनीटात महानाटयाचा प्रयोग थांबवावा लागला. महानाटयाच्या 6 एप्रिलच्या प्रयोगाचे
11 एप्रिल रोजी सादरीकरण करण्यात येणार असल्याचे आयोजन समितीनच्या वतीने जाहीर करण्यात
आले .
भव्य रंगमंच ठरला आकर्षण
या महानाट्यासाठी चार मजली फिरता रंगमंच उभारण्यात आला आहे. 250 हून अधिक कलाकार यात सहभागी झाली आहेत. हत्ती,
घोडे, ऊंट यावरुन निघणारी महानाट्यातील मिरवणूक व फटाक्यांची आतशबाजी खास प्रेक्षकांसाठी
खास आकर्षण आहे. दिनांक 11 एप्रिल पर्यंत दररोज सायंकाळी 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत
या महानाटयाचे सादरीकरण होणार आहे.
दरम्यान आज, लाल
किल्ल्या समोरील माधवदास पार्क येथे ‘राजा छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले. दिल्लीतील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने या स्पर्धेत
भाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment