नवी दिल्ली, 9 : शिवाजी महाराजांनी सामान्य व्यक्तींमध्ये ऊर्जा निर्माण करून
स्वराज्य स्थापन केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाल
किल्ल्यावर ‘श्री. राजा शिवछत्रपती गौरवगाथा’ या महानाटयाच्या प्रयोगा प्रसंगी केले.
लाल
किल्ल्यावरील माधवदास पार्क येथे ‘श्री. राजा शिवछत्रपती गौरवगाथा’
या हिंदी महानाटयाचे आयोजन 6 ते 10 एप्रिल दरम्यान करण्यात आलेले
आहे. आज या महानाटयाच्या प्रयोगा प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी
महाराष्ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
श्री फडणवीस
म्हणाले, शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यात असलेल्या जनतेच्या मनात ऊर्जा निर्माण
करून त्यांना सोबत घेऊन स्वराज्या ची स्थापना केली. इतिहासात अनेक राजे होऊन गेले
मात्र, शिवाजी महाराजांनी जे शौर्य
दाखविले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला न्याय मिळावा, अन्यायाच्या विरोधात कसे लढावे याचे धडे
शिवाजी महाराजांनी घेतलेल्या निर्णावरून दिसते. यासोबतच आपल्या राज्य व्यवस्थापन, जल
व्यवस्थापन, पर्यावरणाचे व्यवस्थापन, आदी सुरळीत चालावे यासाठी काढलेले आदेशांना
आजही आदर्श म्हणुन बघितले जात, असल्याचे
श्री फडणवीस म्हणाले.
शिवाजी महाराजांचे चरित्र हे फार मोठे असून त्याला या महानाटयांच्या माध्यमातुन प्रस्तुत करण्याचे शिवधनुष्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मागील कित्येक वर्षापासून पेलले आहे. त्यामुळेच सामान्य जनतेपर्यंत शिवाजी महाराजांची जीवनचिरत्र पोहोचत असल्याचे, मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी महानाटयाचा प्रयोग सुरू होण्यापुर्वी आरती केली.
No comments:
Post a Comment