नवी दिल्ली, 6 : महाराष्ट्राला संत ,महापुरुष, उद्योजक, साहित्यिक यांच्यासह समृध्द
सांस्कृतिक वारसा लाभला आहे. देश-विदेशात
हा वारसा पोचविण्यासाठी दिल्लीतील ‘पुढचे पाऊल’ ही संस्था प्रभावी ठरेल, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास व जलसंपदा
राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र दिनानिमीत्त येथील
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ‘पुढचे पाऊल’ संस्था व
महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र
महोत्सवाच्या समारोप समारंभात डॉ. सत्यपाल सिंह बोलत होते. पद्मभूषण राम सुतार,
पद्मश्री मालती जोशी, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव
तथा ‘पुढचे पाऊल’ संस्थेचे संस्थापक व
निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यावेळी मंचावर उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले, देशाच्या राजधानीत महाराष्ट्र दिनानिमित्त
‘महाराष्ट्र महोत्सव’ आयोजन करण्याचा ‘पुढचे पाऊल’ या संस्थेचा उपक्रम स्तुत्य आहे.
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी
परिसरातील मराठी बांधवांना एकत्र करून उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न ही संस्था
करीत आहे. महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी राहिली असल्याचे
सांगत प्रत्येकानेच आपल्या मातृभूमी व कर्मभूमीचा अभिमान बाळगून येथील समृध्द
वारसा देश-विदेशात पोचविण्याचे कार्य करणे गरजेचे असल्याचे
ते म्हणाले. ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्या
माध्यमातून दिल्लीतील मराठी अधिका-यांनी या दिशेने कार्य
सुरु केले आहे हा अभिनव उपक्रम असाच पुढे चालावा अशा भावना व्यक्त करत डॉ. सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. नरेंद्र जाधव
अमेरिकेसह जगभर मराठी माणसाने आपली छाप सोडली आहे व त्या -त्या देशात मराठी मंडळाच्या माध्यमातून मराठी जणांना एका मंचावर आणण्याचे कार्य सुरु आहे.
दिल्लीत महाराष्ट्रातील अधिका-यांनी एकत्र
येऊन पुढचे पाऊल या संस्थेच्या माध्यमातून या दिशेने उचलले पाऊल ही कौतुकास्पद बाब
आहे. दिल्लीसह देश व
विदेशातील मराठी जणांनामध्ये प्रभावी समन्वय करून ‘पुढचे
पाऊल’ या संस्थेने महाराष्ट्राची प्रतिमा उंचवावी अशी
अपेक्षा डॉ. जाधव यांनी व्यक्त केली.
पद्मभूषण राम सुतार व पद्मश्री मालती जोशी यांचा सत्कार
या कार्यक्रमात प्रसिध्द शिल्पकार
पद्मभूषण राम सुतार आणि प्रसिध्द लेखिका मालती जोशी यांचा डॉ. सत्यपाल सिंह व डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
0000000000
No comments:
Post a Comment