नवी दिल्ली 18 : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे कोच कारखाना
सुरू करण्याच्या कार्याला गती मिळणार, असल्याची माहिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री
प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली.
येथील परिवहन भवनात आज विदर्भातील रखडलेल्या कामांचा आढावा बैठक
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत झाली.
याबैठकीस केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सरंक्षण राज्य मंत्री सुभाष
भामरे, अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सुनिल देशमुख,
वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
बडनेरा येथील रेल्वे कोच कारखाना उभारण्याबाबतचा निर्णय रेल्वे
मंत्रालयाकडून घेण्यात आलेले आहे. या ठिकाणाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)
ला मंजूरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला गती मिळावी, यासंदर्भात आजच्या बैठकीत
सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच रेल्वे कोच कारखान्याचे काम सुरू करण्यात येईल,
असे आश्वसन रेल्वे मंत्री श्री गोयल यांनी या बैठकीत दिले.
अमरावतीतील
मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकर उभारणार
संरक्षण विभागातर्फे अमरावती
जिल्ह्यातील मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकरच, उभारण्यात येईल, असे आश्वासन
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज दिले.
आज
केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अमरावती येथील प्रस्तावित
मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकर उभारण्याविषयी बैठकीत निश्चित झाले.
या भागात हा
संरक्षण विषयक कारखाना असल्यामुळे या प्रकल्पासाठी कौशल्य आधारित मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे कौशल्य विकासाची
काम तातडीने सुरू करण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले. या कारखाण्यातून कमी
अंतराच्या मार करू शकणा-या क्षेपणास्त्रांची
निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्याचा कायापालटास मदत
होईल.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेले
काम लवकर सुरू करावे : गडकरी
नागपूर-जबलपूर
राष्ट्रीय महामार्गावरील कामठी येथील लष्करी छावणी परीसरातील रखडलेले काम लवकर
सुरू करावे, असे निर्देश केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज
दिले.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम
सध्या सुरू असून कामठी येथील लष्करी छावणी परिसरातून हा महामार्ग निघतो. हा परिसर संरक्षण
विभागाच्या अंतर्गत येतो. या परिसरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे
अनेक दुर्घटना या ठिकाणी होत आहेत. पुढील काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये
यासाठी या परिसरातील काम सुरू व्हावेत, याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीअंती कामठीतील लष्करी छावणी परिसरातील काम सुरू
करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री यांनी संबधितांना दिले.
No comments:
Post a Comment