येथील हयात हॉटेल मध्ये ‘माता
मृत्यूदर’ कमी केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारचे वितरण करण्यात आले. माता
मृत्यूदर कमी करण्यात केरळ राज्य देशात प्रथम आहे. महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक
आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू हे राज्य आहे.
जागतीक आरोग्य संघटनेने
भारताला वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकी 1000 गर्भवती महिले मागे 70 पर्यंत मृत्यूदर
कमी करण्याचे लक्ष दिले होते. केरळ राज्याने हा दर मृत्यूदर 46 पर्यंत आणलेला आहे.
महाराष्ट्र राज्याने हा दर 61 पर्यंत आणला असून तर तमिळनाडू मध्ये हा दर 68 पर्यंत
आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री
डॉ.सावंत यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, माता
मृत्यूदरात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकापर्यंत पोहोचल्याचे समाधान आहे. मात्र हा
दर पुढील काही काळात आणखी कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा राहील.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये महाराष्ट्र प्रथम
या अभियानांतर्गत असलेल्या
संकेतस्थळावर खाजगी तसेच सरकारी डॉक्टर यांची नावे नोंदवावी लागतात. या
संकेतस्थळावर देशभरातील जवळपास 5000 डॉक्टरांनी नावे नोंदविली आहेत. त्यापैकी
महाराष्ट्रातून सर्वाधिक 600 डॉक्टरांचा समावेश आहे. दर महिन्याच्या 9 तारखेला
मातृत्व अभियानांतर्गत डॉक्टर आपल्या सेवा देतात. त्यासाठी महाराष्ट्राला पुरस्कृत
करण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य विभागाचे सचिव प्रदिप व्यास यांनी स्वीकारला.
महाराष्ट्रात हे अभियान
केंद्र शासनाने सुरू करण्याच्या पूर्वी पासून लागू केलेले होते. या अंतर्गत
गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात येते. यासह एनिमिया ग्रस्त गर्भवती महिलांना
आर्यन इंजेश्न दिले जाते. याचा सकारात्मक परिणाम महिलांच्या प्रसूती दरम्यान दिसून
आलेला आहे.
No comments:
Post a Comment