नवी
दिल्ली, 12 : केंद्रीय
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाराष्ट्रातील 3 स्थळांना ‘सर्वोत्कृष्ट
कामगिरी आणि सर्वोत्तम प्रकल्पां’ साठी आज प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील 2 स्थळांचा
आणि पुण्यातील 1 स्थळाचा समावेश आहे.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय नगर विकास
व गृह निर्माण मंत्रालयाच्यावतीने आज ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’
च्या 164 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या
कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री
(स्वतंत्र प्रभार) ए.के. अल्फोंस, केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
राज्यमंत्री विजय गोयल, सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा यांचासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित
होते. यावेळी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे
बांधण्यात आलेल्या इमारती, तसेच त्यांची देखभालींसाठी विविध पुरस्कार व प्रमाणपत्र
प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रमधुन 3 स्थळांचा समावेश यामध्ये आहे.
सामान्य पुल निवासी क्षेत्र (जीपीआरए) कॉलनी हैद्राबाद इस्टेट, नेपीन सी
रोड, मुंबई, या वसाहतीची देखरेख उत्तम केलेल्याबद्दल सर्वोत्कृष्टतेचा प्रथम
पुरस्कार प्रदान करण्यात आला. पश्चिम क्षेत्रामधून मुंबईच्या या कॉलनीची निवड
करण्यात आलेली आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्री गोयल यांच्या हस्ते या भागातील मुख्य अभियंता कृष्णा सोनी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पश्चिम विभागातून शासकीय निवासांच्या स्थापत्याच्या नियोजनासाठी, भारत सरकारच्या लेखा परीक्षा आणि लेखा विभाग
मुंबईच्या अधिका-यांसाठी बांधण्यात येणा-या निवासस्थानाच्या नियोजित आराखडयाला
प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शासकीय निवासस्थानाचे काम येत्या काही
दिवसात सुरू होणार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. वरीष्ठ स्थापत्य अभियंता बुलबुल विश्वास यांनी केंद्रीय
राज्यमंत्री श्री गोयल यांच्या हस्ते हे
प्रमाणपत्र स्वीकारले.
पश्चिम क्षेत्रातील सामान्य पुल निवासी क्षेत्र (जीपीआरए) आणि केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन
केंद्र (सीडब्लुपीआरएस), पुणे येथील निवासी भागात बगीच्याचे बागकाम तसेच देखभालीसाठी
विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे
प्रमाणपत्र उपमहासंचालक फलोत्पादन डॉ. बी.एन. श्रीवास्तव यांच्याहस्ते पश्चिम
विभागाचे फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ.
पी. के. त्रिपाठी यांना प्रदान करण्यात
आले.
00000
अंजुनिमसरकर,
वृविक्र. 256 दि.12-7-2018
No comments:
Post a Comment