नवी दिल्ली, 12 : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी अनुसूचित जातींच्या विविध विषयांवर उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू यांची
भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
उपराष्ट्रपती
यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत श्री आठवले यांनी ऍट्रोसीटी, पदोन्नतीमधील
आरक्षण, अनुसूचित जाती, जमातीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या विषयांवर चर्चा
केली. तसेच याबाबतचे निवेदनही उपराष्ट्रपती यांना सादर केले.
18
जुलैपासून होणा-या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ऍट्रोसीटी कायदा, अनुसूचित
जाती, जमातीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे हे विषय संसदेच्या पटलावर यावे, अशी
विनंती केली. यासह अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा शिष्यवृत्ती
देण्यात यावी. तसेच देण्यात येणारी शिष्यवृत्तीमध्ये महागाईच्या
निर्देशांकाप्रमाणे वाढ करण्यात यावी, अशी विनंती श्री आठवले यांनी उपराष्ट्रपती
नायडू यांच्याकडे केली.
No comments:
Post a Comment