Monday, 16 July 2018

डॉ. प्रशांत देशमुख, डॉ.सखाराम काळे व डॉ.सोमनाथ होळकर नेहरू पुरस्काराने सन्मानित



      













      
नवी दिल्ली, १६ : कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात देशात सर्वोत्तम शोध प्रंबंधासाठी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे वरिष्ठ संशोधक डॉ. प्रशांत देशमुख  डॉ. सखाराम काळे तर डॉ. सोमनाथ होळकर यांना पीक संरक्षण क्षेत्रात सर्वोत्तम शोध कार्यासाठी केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू पुरस्काराने आज सन्मानीत करण्यात आले.
            येथील पुसा परिसरात स्थित भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या .पी.शिंदे सभागृहात आज  भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील सर्वोत्तम शोध प्रबंधासाठी देशातील कृषी संशोधकांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय कृषी राज्य मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव तथा महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यावेळी मंचावर उपस्थित होते.
            कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी यावेळी विषयांसाठी देशातील  एकूण १८ संशोधकांनाजवाहरलाल नेहरू सर्वोत्तम संशोधन पुरस्कार-२०१७ प्रदान करण्यात आला. यावेळी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातसुपारीच्या सालीपासून तंतू वेगळे करण्यासाठी यंत्र सामुग्रीचा विकासविषयावरील डॉ. प्रशांत देशमुख यांच्या संशोधनासाठी त्यांना सन्मानीत करण्यात आले. ५० हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ देशमुख यांच्या संशोधनाविषयी
            डॉ. देशमुख यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती यंत्रे विभागातसुपारीच्या सालीपासून तंतू वेगळे करण्यासाठी यंत्र सामुग्रीचा विकासविषयावरील शोध प्रबंध २०१६ मध्ये पूर्ण केला. डॉ. देशमुख यांनी २०१७ मध्ये हा प्रंबंध भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविला त्याची निवड सर्वोत्तम शोध प्रबंध म्हणून करण्यात आली. सुपारीच्या सालीच्या तंतूच्या गुणधर्मांचा अभ्यास विविध परिक्षणानंतर कोकण कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत करण्यात आलेल्या बिटर साईजच्या यंत्राची माहिती या शोध प्रबंधात देण्यात आली आहे . सुपारीच्या  सालीपासून तंतू वेगळे करण्यात प्रथमच यंत्र तयार झाले त्याचा मोठा फायदा सुपारी उत्पादक शेतक-यांना झाला. हे यंत्र शेतक-यांना हातळण्यास सोपे, वजनाने हलके, लहान आकाराचे असून त्याची किमंत १२ हजार ७०० रूपये आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती यंत्रे विभागाचे  प्राध्यापक  डॉ. शहारे यांच्या  मार्गदर्शनाखाली डॉ. देशमुख यांनी हा शोधप्रंबध  पूर्ण केला आहे.
डॉ सखाराम काळे यांच्या संशोधनाविषयी
            डॉ. सखाराम काळे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कानाडी गावचे असून, सध्या सीफेट संस्थेच्या पंजाब विभागात कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते 1121 पुसा बासमती तांदळाच्या जातीवर संशोधन कार्य केले. डॉ. काळे यांनी २०१6 मध्ये हा प्रंबंध भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविला त्याची निवड सर्वोत्तम शोध प्रबंध म्हणून करण्यात आली.   कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी क्षेत्रात पी.एच.डी केली असून सध्या पूसा बासमती तांदुळ प्रसंस्करणावर शोध कार्य करीत असून, आज त्यांना या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल नेहरु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ५० हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पूसा बासमती तांदुळ जातीच्या यशाबद्दल बोलतांना श्री. राधामोहन सिंग म्हणाले की, आयसीएआरने विकसित केलेल्या बासमती तांदूळच्या पुसा बासमती 1121 जातीमुळे भारताला दरवर्षी 18,000 कोटी रुपये परकीय चलन प्राप्त झाले आहेत.
डॉ सोमनाथ होळकर यांच्या संशोधनाविषयी
डॉ. सोमनाथ होळकर मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याचे असून, मागील पाच वर्षांपासून पीक संरक्षण क्षेत्रात संशोधनाचे सर्वोत्तम कार्य केले. डॉ. होळकर यांनी २०16 मध्ये हा प्रंबंध भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविला त्याची निवड सर्वोत्तम शोध प्रबंध म्हणून करण्यात आली. सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या प्रवरा नगर येथे कार्यरत असून यापर्वूी ते भारतीय ऊस्संशोधन संस्था, लखनऊ येथे कार्यरत होते. पीक संरक्षण या  क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल नेहरु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ५० हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
                                              ******
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२६१/ दिनांक १६.०७.२०१८
सूचना: सोबत छायाचित्र जोडली आहेत.

No comments:

Post a Comment