नवी
दिल्ली, 30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाच्या
विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्र परिचय
केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची
माहिती जाणून घेतली.
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या
या 26 विद्यार्थ्यांनी, विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि सहयोगी प्राध्यापक संदीप नरडेले यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय
केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत
केले. यावेळी परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे उपस्थित होत्या.
यावेळी औपचारिक वार्तालाप
झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत
कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात
येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय,
प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, नव माध्यमांचा प्रभावी उपयोग, परिचय
केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शासनाचा जनसंपर्क साभांळताना
घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर आयोजित
राष्ट्रीय कार्यशाळा, शासनाच्या जनसंपर्कासाठी कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला
प्रभावी उपयोग याविषयी माहिती दिली .
तसेच, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून
जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाचा
पुढाकाराबाबतही माहिती दिली. परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे
विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. यावेळी
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना श्री.
कांबळे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व कार्याविषयी सादरीकरण केले तर
वृत्तपत्रविद्या
व जनसंज्ञापन विभागाची विद्यार्थ्यांनी जयश्री पाटील यांनी आभार मानले. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांना यावेळी
महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली.
0000000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र.२८१/ दिनांक ३०.०७.२०१८
No comments:
Post a Comment