नवी दिल्ली, 13
: देशातील
स्वच्छ रेल्वे स्थानकांचा
अहवाल आज रेल्वे मंत्री पियुष गोयल
यांनी जाहीर केला. महाराष्ट्रातील एकूण
36 रेल्वे स्थानकांचा यात समावेश असून श्रेणी 'अ 1’ मध्ये
वांद्रे रेल्वे
स्थानकाने 7 वा क्रमांक पटकावत देशात पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे.
गुणांकणात सुधार झालेल्या रेल्वे स्थानकांच्या श्रेणी
'अ1’ मध्ये मुंबई-सीएसटी स्थानकाने 9 व्या तर दादर रेल्वे
स्थानकाने 1o व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रेल
भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देशातील
स्वच्छ रेल्वे स्थानकांचा समावेश असलेल्या ‘स्वच्छ रेल
स्वच्छ भारत’ अहवालांतर्गत रेल्वे स्थानकांची नावे जाहीर
केली. यावेळी रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अहवालांतर्गत देशातील
407 रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली. यात श्रेणी ‘अ 1’ मध्ये एकूण
75 रेल्वे स्थानकांत महाराष्ट्रातील 10 रेल्वे स्थानकांचा तर, श्रेणी
'अ' मध्ये एकूण 332 रेल्वे स्थानकांत राज्यातील 26 अशा
एकूण 36 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. दोन्ही श्रेणींमध्ये
गुणांकणात सुधार झालेल्या सर्वोत्तम 10 रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली असून
‘अ 1’ श्रेणीत मुंबई-सीएसटी स्थानकाने 9
वा तर दादर रेल्वे
स्थानकाने 10 क्रमांक मिळवला आहे.
महाराष्ट्रातील
36 स्वच्छ रेल्वे स्थानके
या अहवालात देशातील एकूण 75 रेल्वे स्थानकांची अ1 श्रेणी मध्ये निवड
करण्यात आली. यात पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानाकाने 7 क्रमांक मिळवत पहिल्या 10 मध्ये जागा पटकाविली आहे. मुंबई
सीएसटी, पुणे,नागपूर,लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, दादर,ठाणे आणि
कल्याण या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.
देशातील एकूण
332 रेल्वे स्थानकांची निवड ‘अ’ श्रेणी मध्ये करण्यात आली असून महाराष्ट्रातील 26 रेल्वे
स्थानकांचा यात समावेश आहे. या श्रेणीत राज्यातील अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह,अमरावती,वर्धा,भुसावळ,
शेगाव, कोल्हापूर,चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना,जळगाव, गोंदिया,
मिरज सांगली, लातूर, शिर्डी, चंद्रूपूर, पनवेल, लोनावळा, परभणी, कोपरगाव ,औरंगाबाद
रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई-सीएसटी व दादर
रेल्वे स्थानकांच्या गुणांकणात सुधार
देशातील रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेबाबत या अहवालात मोठया प्रमाणात सुधारणा झाली आहे. मुंबई-सीएसटी
व दादर रेल्वे स्थानकांची मागील वर्षापेक्षा स्वच्छता यादीत सुधारणा झाली
आहे. गेल्यावर्षीच्या ६७९.१ गुणांहून मुंबई-सीएसटी रेल्वे स्थानकाने ८९३.४ अंकावर
झेप घेत गुणांकणात सुधार झालेल्या 'अ १’ श्रेणीतील पहिल्या
१० स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत ९ वे स्थान मिळवले आहे. दादर रेल्वे स्थानकाने गत वर्षीच्या ५५२.२ गुणांहून
सुधार करत ९१३ गुण मिळवत याच
श्रेणीतील १० वा क्रमांक पटकाविला आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 8
स्थानकांचा अहवालात समावेश
स्वच्छ
रेल्वे स्थानकांच्या अहवालात मुंबई
उपनगरीय रेल्वेच्या एकूण 8 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यात ‘अ 1’ श्रेणी
मध्ये वांद्रे, मुंबई सीएसटी, मुंबई
सेंट्रल, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस्, दादर आणि कल्याण या
रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर ‘अ’ श्रेणीत पनेवल रेल्वे स्थानकाचा समावेश
आहे.
असे झाले सर्वेक्षण
रेल्वे
मंत्रालयाच्यावतीने 2016 पासून ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे विविध मानकांवर नामांकित
संस्थेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीही देशातील रेल्वे स्थानकांचे दोन
श्रेणींमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकांहून वर्षाकाठी 50 कोटींपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात अशा रेल्वे स्थानकांना 'अ 1’ श्रेणी मध्ये तर 6 ते 50 कोटीं प्रवाशी प्रवास करणा-या रेल्वे
स्थानकांना 'अ' श्रेणी मध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्थानका शेजारील खुल्या परिसरात
स्वच्छता गृह, मुख्य प्रवेश द्वारा शेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता. तसेच रेल्वे स्थानकावर खुल्या ठिकाणी आसन व्यवस्था,
विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतीक्षालय,
रेल्वे रूळ आणि पादचारी आदी बाबींचे सर्वेक्षण होऊन या रेल्वे स्थानकांचे मानांकन
ठरविण्यात आले आहे. या सर्वांसाठी 1000 गुण ठरविण्यात आले
होते पैकी विविध मानकानुसार गुणांकन करण्यात आले.
०००००
रितेश भुयार /वृत्त वि.
क्र.304/ दिनांक 13.08.2018
No comments:
Post a Comment