नवी दिल्ली दि. 11: राज्याचे वित्त
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘सोसायटी एक्सलेन्स 2018’ च्या
पुरस्काराने आज दिल्ली येथे गौरविण्यात आले.
मॅग्ना
प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात सोसायटी एक्सलेन्स या पूरस्काराने वित्त मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांना गौरविण्यात आले. पुरस्कार
राजकारणाचा समाजाच्या उन्नतीसाठी उपुयक्त केलला वापर यासाठी प्रदान करण्यात आला. पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या
प्रतिक्रियेत वित्त मंत्री म्हणाले, पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला असून अशा
पुरस्काराने काम करण्याची उर्जा मिळते.
आज
झालेल्या कार्यक्रमात विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
00000
सूचना: सोबत फोटो जोडले आहे.
अंजूनिमसरकर/मा.अ./वृत्तविशेषक्रमांक 303
No comments:
Post a Comment