Friday, 17 August 2018

अटलजी वैश्विक नेते - राज्यपाल सी विद्यासागर राव



नवी दिल्ली, 17 : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे लोकशाहीचे आदर्श होते, ते केवळ भारतीय नव्हे तर वैश्विक नेते होते अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी अटलजींना श्रध्दांजली अर्पण केली.

आज सकाळी 6-ए, कृष्ण मेनन मार्ग या त्यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर आपल्या प्रतिक्रीया देतांना राज्यपाल म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, असताना त्यांच्यापासून ब-याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आदिवासींना जमीनीचे पट्टे देण्याचा शासकीय आदेश तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात काढण्यात आला. नंतर संशोधित वन कायदाच झाला तयार करण्यात आला. याचा पाया श्री वाजपेयी यांनीच रचला असल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरने महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रात आदिवासी कोषातून 5 टक्के रक्कम आदिवासी कल्याणासाठी देण्याची अधिसूचना राज्यात काढण्यात आली. आदिवासींचा सर्वोतोपरी विकास व्हावा यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली काम सदैव डोळयापुढे राहत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

श्री वाजपेयी यांनी आयुष्यभर लोकशाही मुल्य जपण्याचे काम केले होते. मुल्याआधारीत राजकारण श्री वाजपेयी यांनी केले. श्री वाजपेयी यांच्यासोबत 1972 पासून झालेल्या कौटुबिंक आणि सार्वजनिक भेटींना राज्यपाल यांनी उजाळा देत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

0000000

अंजु निमसरकर/मा.अ/क्र.311/दि.17-08-2018

No comments:

Post a Comment