नवी दिल्ली, 29
: महाराष्ट्र
सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची शपथ घेण्यात आली.
दिनांक
29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले असून यातंर्गत आज ‘भ्रष्टाचार
निर्मुलना’ची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र
सदनातील सभागृहात
आयोजित कार्यक्रमात निवासी
आयुक्त (अ.का.) समीर
सहाय यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सत्यनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी
सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु सिंधु, विजय कायरकर यांच्यासह अन्य अधिकारी
तसेच कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची
शपथ
महाराष्ट्र परिचय केंद्रातही ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची
शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित
अधिकारी-कर्मचा-यांना सत्यनिष्ठा
राखण्याची शपथ दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु
निमसरकर तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
000000
अंजुनिमसरकर/वृ.क्र.388/26/10/2010
No comments:
Post a Comment