नवी दिल्ली, 5 : नागपूर
जिल्ह्यातील कामठीमधील सुप्रसिद्ध
ड्रॅगन पॅलेस येथे ‘आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट शांती परिषद’ दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची, माहिती केंद्रीय
अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या सुलेखा कुंभारे यांनी आज दिली.
सुश्री कुंभारे यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. या परिषदेस केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितिन गडकरी,
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय पर्यटन मंत्री (स्वतंत्र प्रभार)
के.जे.अल्फॉन्स उपस्थित राहणार असल्याची माहिती सुश्री कुंभारे यांनी
दिली.
धम्मचक्र परिवर्तन सोहळयाचा
कार्यक्रम नागपूरतील दिक्षाभूमी येथे दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमास
बौध्द धर्माचे जगभरातील अनुयायी मोठया संख्येने येतात. यावेळी नागपूर परिसरातील
बौध्द स्थळांनाही हे अनुयायी भेटी देतात. ड्रॅगन पॅलेस येथेही लाखो अनुयायी
दरवर्षी येतात. याचे औचित्य साधून या आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट शांती परिषदेचे
आयोजन केले असल्याचे सुश्री कुंभारे यांनी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेस चीनी, जपान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आदि
बुध्दीस्ट देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. देशातील बौध्द स्थळांच्या
पायाभूत सुविधा, येथील दळणवळणाची साधने,
पाली भाषेतील बौध्द साहित्य आदिविषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा होणार
असल्याची माहिती सुश्री कुंभारे यांनी दिली.
No comments:
Post a Comment