केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री
सुरेश प्रभु यांची उपस्थिती
नवी दिल्ली, 19 : प्रगती
मैदान येथे सुरु असलेल्या 38 व्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात मंगळवार दिनांक 20 नोव्हेंबर 2017 रोजी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश
प्रभु यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होणार आहे. या कार्यक्रमाच्या
माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शण घडणार आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2018 ला 14 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली.
या मेळाव्यात दररोज सायंकाळी ‘हंसध्वनी
सभागृह’ येथे व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमाअंतर्गत दिनांक 20 नोव्हेंबर
2018 सायंकाळी 5.30 वाजता. येथील हंसध्वनी
सभागृहात ‘महाराष्ट्र दिन’
साजरा करण्यात येणार आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते या
कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार आणि महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यावेळी
उपस्थित असतील. मुंबई येथील 'पृथ्वी आर्ट' गृपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार
असून या माध्यमातून व्यापार मेळयास भेट देणा-या देश-विदेशातील उद्योजक
व ग्राहकांना महाराष्ट्राच्या
वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन होणार आहे.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.400/ दिनांक
१९.११.२०१८
No comments:
Post a Comment