Tuesday, 20 November 2018

महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार नागपुरची कांचनमाला पांडे ठरली देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू



नवी दिल्ली, २० : केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणा-या राष्ट्रीचय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८ ची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. नाशिकचा स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने जागतिक अपंगदिनानिमित्त देशातील दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्यकरणा-या संस्थांना राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८ साठी विविध १४ श्रेणींमध्ये देशातील एकूण ६९ व्यक्ती व संस्थांना यावर्षी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांचा यात समावेश आहे. ३ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
कांचनमाला पांडेच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल
नागपूरच्या कांचनमाला पांडे हीने मेक्सिको येथे पार पडलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते व या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली होती. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कांचनमालाचा सत्कार केला होता व १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने कांचनमाला ला जलतरण प्रशिक्षक म्हणून नोकरीही देवू केली आहे. आता क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाची दखल घेऊन तिला सर्वोत्कृष्ट महिला दिव्यांग क्रीडापटूचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.
जन्मांध असणा-या कांचनमालाने हे जग बघीतले नाही मात्र जगाला तिच्या कार्याचा हेवा वाटावा अशी तिची कामगिरी आहे. कांचनमाला ही मुळची अमरावतीची. अमरावती मध्यवर्ती कारागृहाशेजारील आनंद स्टेट बँक कॉलनीत तीचे वास्तव्य. कांचनमाला ने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरवीले. सध्या ती नागपूर येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयात सहायक पदावर कार्यरत आहे.
कांचनमालाने जवळपास १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले .अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिप मध्ये तिने जवळपास १०० हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. कांचनमाला ही दहावी व बारावी मध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षण पूर्ण करीत असतानाच ती बँकींगची तयारी करित होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली व बँकेच्या नागपूर शाखेत गेल्या ३ वर्षांपासून सहायक पदावर कार्यरत आहे.
नाशिकचा स्वयं पाटील ठरला सृजनशील दिव्यांग बालक
जन्मत: डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त स्वयं पाटील च्या हृदयाला छिद्र झाले यातून बरा होत नाही तर त्याच्यावर खानाशी संबंधीत तीन शस्त्रक्रिया झाल्या यातही त्याच्या आई -वडीलांनी खचून न जाता त्याला धिर देत सांभाळ केला. नाशिकच्या जाजू माध्यमिक विद्या मंदिर येथे आता स्वयं सामान्य मुलांच्या शाळेत ५ व्या वर्गात शिकतो. त्याने गेटवे ऑफ इंडिया ते सॅनक्रॉक हे ५ कि.मी.चे समुद्रातील अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करून जलतरणात ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’ स्थापीत केला आहे. अपंगत्वावर मात करून स्वयं सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेत आहे, तो उत्तम डांस करतो व विविध डांस स्पर्धांमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आहेत. स्वयं ने मॉडेलींगही केली आहे व ‘डी कॅटलॉन’ या नामांकित कंपनीसह नाशिकच्या ‘अशोका रिसॉर्ट’साठी जाहीरातही केली आहे. स्वयंच्या याच अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सृजनशील बालकाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे येथील दृष्टीबाधीत भुषण तोष्णीवाल यांना रोल मॉडेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ठ दिव्यांग कर्मचा-याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी तर दिव्यांगाच्या उत्थानासाठी कार्य करणारे मुंबईतील बोरीवली पूर्व चे योगेश दुबे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा व पुणे येथील मॉडर्न कॉलेजला पुरस्कार
दिव्यांग पुरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थाची निवड झाली असून या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत देशात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे संकेतस्थळ तर खाजगी क्षेत्रात पुणे येथील मॉडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ठ ठरले आहे.
मुंबई येथील वरळी सिफेस भागातील नॅब एम्प्लॉयमेंट या संस्थेला दिव्यांगासाठी रोजगार उपलब्ध करून देणा-या संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :













http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment